मावळ ऑनलाईन – तळेगाव आणि वडगाव या दोन शहरांना( Talegaon-Vadgaon road) जोडणारा जुना रस्ता अरुंद आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय मान्यतेमुळे या रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. इथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. ११० मीटर रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास इथली वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. हा रस्ता १५ मीटर रुंद केला जाणार आहे.
Rashi Bhavishya 30 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
औदयोगिकीकरणामुळे या दोन शहरांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यादृष्टीने पुरेशा मूलभूत नागरी सुविधांची मात्र उणीव आहे. तळेगावातील पैसाफंड काच कारखान्यासमोरुन वडगाव हद्दीतील विशाल लॉन्सकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी पूर्ण झाला आहे. त्यावरुन रहदारीही सुरू आहे. मात्र जोडरस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. वडगाव नगरपरिषद हद्दीतील डांबरीकरण पूर्ण झाले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतही चाकण रस्त्यापासून आतपर्यंत नुकतेच डांबरीकरण पूर्ण झाले.
Pune : सीबीआय कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची एक कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक
मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव फाट्यावरील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील वाहतूक ( Talegaon-Vadgaon road) कोंडी टाळून तळेगाव दाभाडे शहरातून एमआयडीसी आणि वडगाव मावळकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आणि जवळचा आहे. विद्यार्थी, रुग्णालयांचे कर्मचारी, एआयडीसीतील कामगार आणि हजारो स्थानिक वाहनधारकही या रस्त्याचा वापर करतात. मात्र वडगावकडे जाताना गंगा सोसायटीच्या पुढे रस्ता खूपच अरुंद आहे. दक्षिणेला रस्त्यालगत खोल खड्डा आहे. त्यात वाहने कोसळून अपघाताची शक्यता आहे. जेमतेम सात-आठ फूट रुंदीच्या चिंचोळ्या आणि तीव्र उताराच्या दोन शहरांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याकडे होणारे तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष चिंताजनक आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास, वेळेचा अपव्यय आणि अपघातांचा धोका यावर नगर परिषदेने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दुसऱ्याला रस्ता देण्यासाठी वाहने मागे-पुढे घेण्यावरून वादही होतात. त्यातच डंपर, टॅंकर आणि इतर अवजड वाहनेही याच रस्त्याने धावतात. त्यामुळे कोंडी वाढते. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे युद्धपातळीवर रुंदीकरण करावे अशी विद्यार्थी, वाहनधारक, नागरिकांची मागणी आहे. ( Talegaon-Vadgaon road)
११० मीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यापूर्वी दक्षिण बाजूच्या खड्यात भराव टाकण्यासाठी रिटेनिंग वॉल बांधावी लागणार आहे. या कामासाठी एक कोटी १८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आर्थिक तरतुदीला मान्यतेसाठी पाठविलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
- राम सरगर, शहर अभियंता, तळेगाव दाभाडे नगर परिषद.
रस्त्यावरून एकच चारचाकी वाहन कसेबसे जाऊ शकते. उत्तरेला संरक्षक भिंत आणि दक्षिणेला खड्याच्या बाजूने झाडेझुडपे असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे वाहने समोरासमोर येतात.
- महेश फुसे, स्थानिक नागरिक. ( Talegaon-Vadgaon road)



















