मावळ ऑनलाईन – देहूरोड परिसरात घरफोडी करून ( Dehu Road Burglary)अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून सुमारे २ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली.
फिर्यादी प्रमोद काळे (रा. देहूरोड) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी ( Dehu Road Burglary)त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून चोरटे पसार झाले.
परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास करून ठसे गोळा केले आहेत. देहूरोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला ( Dehu Road Burglary) आहे.






















