मावळ ऑनलाईन – वडगाव नगरपंचायतीतील यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये(Vadgaon Nagar Panchayat) नगराध्यक्षपदाची निवडणूक अतिशय चुरशीची व प्रतिष्ठेची होणार असून या पदासाठी दहा महिला इच्छुक असून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे तर प्रथम महिला नगराध्यक्ष पदी कोण असणार ? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Rashi Bhavishya 30 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
वडगाव ही मावळ तालुक्याची राजधानी असून ऐतिहासिक दृष्ट्या(Vadgaon Nagar Panchayat) नावलौकिक प्राप्त असे शहर आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी वडगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे तर पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान अपक्ष उमेदवार म्हणून मयूर ढोरे यांनी मिळवला होता.
Talegaon Municipal Council : तळेगाव नगरपरिषद शिक्षण विभाग प्रशासन अधिकारीपदी अनिता वैद्य
नगरपंचायतीचे एकूण १७ वार्ड असून सर्वच पक्षात आणि त्यांचे इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. ही आगामी सार्वत्रिक निवडणूक भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) व महाविकास आघाडी (काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना उबाठा, असे, वंचित) तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वडगावच्या सर्व लढती ह्या बहुरंगी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यात महायुती असली तरी मावळात मात्र महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा आहे तालुक्यात त्याच वेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि देहू नगरपंचायत या ठिकाणी निवडणूका होत असल्याने पक्षनिहाय उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धेत आहेत. (Vadgaon Nagar Panchayat)
वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. तर महिला नगराध्यक्ष होण्याची संधी प्रथमच आली असल्याने स्थानिकांमध्ये जोरदार स्पर्धा चालू आहे.
या नगराध्यक्षपदासाठी अबोली ढोरे, सुनिता कुडे व वैशाली पंढरीनाथ ढोरे या तिघी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) इच्छुक असून भारतीय जनता पक्षाकडून सुप्रिया चव्हाण, सीमा भोसले, सुनंदा म्हाळसकर, सोनाली म्हाळसकर, सारिका भिलारे,राणी म्हाळसकर या तीव्र इच्छुक आहेत तर मनसे कडून सायली म्हाळसकर या उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत आहेत. (Vadgaon Nagar Panchayat)
नगरपंचायतीमध्ये एकूण सुमारे २० हजार १४० मतदार असून १७ पैकी ९ जागा या महिलांकरता आहेत. प्रत्येक वार्डात तीन ते चार उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता असून काही वार्डामध्ये तीव्र इच्छुकामुळे बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुका प्राधान्याने पक्ष पातळीवर होण्याची दाट शक्यता असल्याने तालुक्यातील पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच चालू आहे.
खालील प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे (Vadgaon Nagar Panchayat)
प्रभाग क्र. १ – अनुसूचित जमाती (ST) महिला
प्रभाग क्र. २ – ओबीसी सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. ४ – ओबीसी महिला
प्रभाग क्र. ५ – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ६ – ओबीसी सर्वसाधारण
प्रभाग क्र. ७ – अनुसूचित जाती (SC) सर्वसाधारण
प्रभाग क्र. ८ – ओबीसी महिला
प्रभाग क्र. ९ – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. १० – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ११ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १२ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १३ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १४ – अनुसूचित जाती (SC) महिला
प्रभाग क्र. १५ – सर्वसाधारण
प्रभाग क्र. १६ – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. १७ – सर्वसाधारण महिला























