Team My Pune City –वडगाव नगरपंचायतीच्या (Vadgaon Maval)सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक सन २०२५ करीता दि ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार आणि प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने, तसेच निवडणुक आयोगाकडील प्राप्त संभाव्य यादीअन्वये प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. आणि ती नावे एकापेक्षा अधिक वेळा आली असल्याचे आढळुन आले आहे. तरी प्रारुप मतदार यादीतील अशा दुबार नावांची यादी वडगांव नगरपंचायत सूचना फलकावर तसेच https://mahaulb.in या संकेतस्थळावर दि २९ ऑक्टोबर २०२५ पासुन उपलब्ध आहे.
Jain Boarding Case : जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ यांचं नाव विनाकारण ओढलं जातंय – देवेंद्र फडणवीस
या यादीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांना कोणत्या प्रभागात मतदान करावयाचे आहे, याबाबत लेखी अर्ज रहिवास पुराव्यासह दि ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वडगाव नगरपंचायत कार्यालयात सादर करावेत, अशी सूचना प्रशासक तथा मुख्याधिकारी वडगाव नगरपंचायत डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे.



















