मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे ( Maval Taluka NCP) भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
Rashi Bhavishya 28 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
या वेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, ज्येष्ठ नेते शांताराम लष्करी, सरपंच शिवाजी करवंदे, भिकाजी भागवत, मारुती असवले, किसन गवारी, भास्कर पिचड, बुधाजी पिचड, सदाशिव निसाळ, माजी सरपंच मारुती खामककर, बळीराम भोईरकर यांसह पक्षाचे कार्यकर्ते ( Maval Taluka NCP) उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मे महिन्यातील असमयिक पावसामुळे भात पेरणी वेळेवर होऊ शकली नाही. शेतकऱ्यांनी रोपे गोळा करून काही प्रमाणात लागवड केली होती. मात्र, आता कापणीच्या टप्प्यावर असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिके जमिनीत कोसळली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाह आणि घेतलेल्या कर्जफेडीचे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई तसेच विमा भरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात ( Maval Taluka NCP) आली आहे.























