मावळ ऑनलाईन – मुलगी झाल्याचा राग मनात धरून पत्नीचा गळा (Vadgaon Maval)दाबून खून करणाऱ्या नराधम पतीस वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी शुक्रवारी (दि. 12) हा ऐतिहासिक निकाल दिला.
शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव योगेश कैलास जाधव (वय 33, रा. चंदनवाडी, चांदखेड, मावळ) असे आहे. तर खून झालेल्या पत्नीचे नाव चांगुणा योगेश जाधव असे आहे. याप्रकरणी चांगुणा यांच्या वडिलांनी, शिवाजी दामू ठाकूर (वय 45, रा. परंदवाडी, मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
Talegaon Dabhade: नगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय सुरू;गोल्डन रोटरीचा अभिनव उपक्रम
Pune Crime News : वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन जण अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हा पत्नीशी मुलगी झाल्यापासून नेहमीच वाद घालत असे. तो तिला मारहाण करीत असे. अखेर 28 ऑगस्ट 2021 रोजी वादाच्या भरात त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली होती.