मावळ ऑनलाईन – वारंगवाडी मावळ येथील श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर वारंगवाडी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या उत्सवाला प. पू. सद्गुरु श्री स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस निरंजन स्वामी) महाराज यांचे पावन ( Vadgaon Maval ) सान्निध्य लाभले.
उत्सवाची सुरुवात पहाटे ६ वाजता ध्यान साधनेने झाली. त्यानंतर सकाळी ७ ते १० या वेळेत रुद्राभिषेक, श्री गुरुपूजन, आरती, पुष्पांजली, गुरुगीता व स्तोत्रपठण असे विविध धार्मिक विधी पार पडले. मंदिर परिसरात मंत्रघोष, शंखनाद आणि भक्तीमय विचार वातावरणाने भारावले ( Vadgaon Maval ) होते.
सकाळी १० ते ११.३० या वेळेत प. पू. सद्गुरुंच्या उपस्थितीत भाविकांसाठी सत्संग आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. प्रवचनात त्यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व विषद केले. स्वामींनी गुरु शिष्य महती आणि यथार्थ व आदर्श गुरू व आदर्श शिक्षकाचा असावा याबाबत निरूपण केले.त्यानंतर श्री सद्गुरुंच्या हस्ते सामूहिक आरती पार ( Vadgaon Maval ) पडली.
Rashi Bhavishya 11 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
दुपारी १२ वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवात मावळ परिसरासह आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या श्रद्धावान भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी गणेश मोरे, विजय शिंदे, वामनराव तुपे, बाळासाहेब वारींगे, नंदकुमार भसे, गणेश फलके, अजय दाभाडे, संजय दाभाडे, पांडुरंग मटकर, कुमार भारती आदीसह पंचक्रोशीतील तसेच हडपसर, पुणे, संगमनेर, पाटस, अहमदनगर, करमाळा, सोलापूर, माळेगाव, धुळे आदी ठिकाणावरून शिष्यगण भक्तगण आले होते.
या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या आयोजनासाठी श्री सद्गुरु निरंजनस्वामी सत्संग मंडळ आणि श्री निरंजनस्वामी आश्रम, वारंगवाडी (ता. मावळ, जि. पुणे) यांच्यावतीने सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. संपूर्ण दिवस भक्तीमय वातावरणात भक्तगणांनी सद्गुरुंच्या सान्निध्यात गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा ( Vadgaon Maval ) केला.