मावळ ऑनलाईन –मागील काही दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Talegaon Dabhade)जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीचा हात देत तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याचे संकलन केले. हे साहित्य पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.
जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थ्यांनी विना सहकार नाही उद्धार या कथना प्रमाणे समर्पक अशी जबाबदारी आपल्या कृतीतून दर्शवली.
मागील काही महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पाहता सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील या मदत कार्यासाठी खारीचा वाटा उचलला.
पावसामुळे काही ठिकाणी अनेक शाळा शालेय साहित्य याचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक साधनांच्या मदतीच्या माध्यमातून परोपकार मदत भावना या नैतिक मूल्याचे जतन केले.
जैन इंग्लिश स्कूल येथील दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सामाजिक बांधिलकी जपत मावळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने आलेल्या एका सूचनेचे अल्पावधीत पालन करून मोठ्या प्रमाणात साहित्य शाळेमध्ये जमा केले.
Prashant Bhagwat: प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने जांभूळ येथे महिलांसाठी खास पर्व – “मनोरंजन संध्या २०२५” उत्साहात !
Pune : राजगडावर मधमाश्यांचा हल्ला; घाबरलेली तरुणी दरीत कोसळली
विद्यार्थ्यांच्या या मदतीच्या माध्यमातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल फुल ना फुलाची पाकळी म्हणून विद्यार्थ्यांनी दिलेल्या शालेय वस्तू देण्या मागची विद्यार्थ्यांची मानवतेची भावना अतिशय महत्त्वाची ठरली कोणतीही आपत्ती निर्माण झाली तरी एकतेचा संदेश देणारी पिढी आपली भारतीय संस्कृती नक्कीच जपत आहे.असे विद्यार्थ्यांच्या या सामाजिकउपक्रमातून दिसून आले.
विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात दिलेल्या शालेय साहित्याच्या मदतीतून त्यांनी सर्वांनाच आवाहन केले आहे की आपण सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजातील सर्वच घटकांनी या पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदत करावी























