Team My Pune City –मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे किल्ले बनविण्याची(Vadgaon Maval) स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना परीक्षक आणि आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले. कै. बबनराव मारुती कलावडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली जाते. आणि यावर्षी आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते.
कै. बबनराव मारुती कलावडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दीपावलीनिमित्त तसेच आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले बनवा स्पर्धा वारंगवाडी येथे घेण्यात आली.या स्पर्धेत गावातील ४९ लहानग्यांनी सहभागी होत विविध गड किल्ल्यांच्या अतिशय सुंदर प्रतिकृती बनविल्या. छोट्या स्पर्धकांच्या गडकिल्ल्यांना परिक्षकांनी भेटी दिल्या त्यावेळी गडकिल्ल्यांबद्दल अतिशय सुंदर माहिती छोट्या मुलांनी परीक्षकांना दिली.प्रत्येक स्पर्धक किल्लेदाराला छत्रपती शिवाजीमहाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
Jain Boarding Case : जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ यांचं नाव विनाकारण ओढलं जातंय – देवेंद्र फडणवीस
Maval Taluka NCP : अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी- राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक विक्रम कलावडे,बाळासाहेब तुमकर, संकेत शिंदे,उद्योजक संजय वारिंगे, सोमनाथ गव्हाणे,दत्तात्रय वारिंगे, सचिन वारिंगे, दत्तात्रय शिंदे,शेखर शेळके,धनंजय काकडे,रोहित वारिंगे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधुरीताई वारिंगे,सुप्रिया कलावडे, ज्योतीताई शिंदे,पिंकी शेळके आदी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकाच्या किल्ल्याजवळ जाऊन पाहणी करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व लहानग्यांचा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.




















