मावळ ऑनलाईन – तळवडे येथील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागे अमरजित जेधे यांची बांधकाम साईट असलेल्या मोकळ्या जागेत दोघांचा खून झाल्याची घटना बुधवारी (२५) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली (Talwade Murder) आहे. अनैतिक संबंधातून दुहेरी खून झाल्याचे समोर आले आहे.
Talegaon Crime News : टेम्पोत भरून दिलेल्या साहित्याचा अपहार
मंगला सुरज टेंभरे (वय ३०, रा. अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलीक सरोदे (वय ५५, रा. अकोला) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दत्तात्रय लक्ष्मण सावळे (वय ४९, रा. चिखली) याला अटक केली आहे.
Chinchwad : पाच जणांच्या टोळक्याने दारूच्या नशेत फोडली वाहने
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलिसांना डायल 112 वरून रात्री तीनच्या सुमारास माहिती मिळाली कि, तळवडे येथे दोघांचे मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडले आहेत. त्यानुसार देहूरोडचे रात्रगस्त अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मयत मंगला टेंभरे यांचा पती सुरज टेंभरे यांनी पोलिसांना सांगितले कि, मंगला व सरोदे हे रात्री दारू पित बसले होते. रात्री दोनच्या सुमारास ठेकेदार सावळे यानेच मला माहिती दिली की दोघे अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले (Talwade Murder) आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर दोघांचा दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले.
प्रकरणातील सर्व शक्यता लक्षात घेत पोलिसांनी आरोपी सावळे याला अटक केली. तो मुळगावी पळून जात होता. सावळे आणि सरोदे या दोघांचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून हा खून झाल्याचे समोर आले (Talwade Murder) आहे.