मावळ ऑनलाईन –स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या (Talegaon Dabhade)बालविकास विद्यालयात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये गुरू प्रति आदर व्यक्त करणारे भाषण, नाटिका, नृत्य, कविता तसेच विविध खेळ यांचे आयोजन केले होते. शिक्षकांना पुष्पगुच्छ, भेट कार्ड देऊन विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ४ सप्टेंबर रोजी पूर्णवेळ शाळा सांभाळली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत पूर्णपणे समरस होऊन शिकवण्याचे काम केले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी रमा देशपांडे हिने मुख्याध्यापक यांना पद देखील सांभाळले. इयत्ता ५वी ते ९वी विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते.
५सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञता सोहळा व शिक्षक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विविध पारितोषिके देण्यात आली. नावे पुढीलप्रमाणे-
बेस्ट टीचर-
1) बीएड कॉलेज सौ अलका नारखेडे.
2) ज्यु कॉलेज- ऋतुजा वाडेकर.
3) माध्यमिक विभाग-
1) रेणुका मेढी.
2) श्रद्धा क्षीरसागर.
4) प्राथमिक विभाग-संगीता म्हसेकर.
5) पूर्व प्राथमिक विभाग- तृप्ती बेद्रे
पॉप्युलर टीचर
ज्यू कॉलेज- दीपक खटावकर,
स्नेहा निकम
माध्यमिक विभाग – निलांबरी महाजन,
दिव्या भारती
प्राथमिक विभाग- शामल कुडके.
पूर्व प्राथमिक विभाग- अमृता देशमुख,
ऑनर ऑफ डे तेजस्विनी शिंदे.
मान्यवरांच्या हस्ते असे पुरस्कार देऊन सर्व विभागातील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
Pune Ganpati Visarjan 2025: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात व ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींना भावूक निरोप
Bhaje Maval: श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे ,उपाध्यक्ष सुभाष खळदे ,सचिव किशोर राजस , खजिनदार सुनील कडोलकर,संस्थापक डॉ. सु. मो. ढाकेफळकर , उद्योजक बाळासाहेब काकडे,
संस्था सदस्य अशोक काळोखे, सुरेशभाऊ चौधरी , नंदकुमार नागुलपिल्ले,मुख्याध्यापिका नूतन कांबळे, कार्यालयीन अधीक्षक सुजाता कुलकर्णी, सर्व विभाग पर्यवेक्षक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता कुलकर्णी
यांनी केले. आशा शिंदे यांनीआभार मानले.