मावळ ऑनलाईन – ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तळेगाव दाभाडे शहरातील ( Water Supply) नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. सोमाटणे पंपिंग स्टेशन येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नगरपरिषद प्रशासनाने शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे.
Kondhwa Crime News : कोंढव्यात हत्याराने तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्या तीन तरुणांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, सोमाटणे पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या एक्स्प्रेस फीडरचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता. या सततच्या वीज खंडिततेमुळे पाईपलाईनमध्ये बॅकप्रेशर निर्माण झाले. या तीव्र दाबामुळे २० इंची मुख्य दाबनलिकेवरील मेन व्हॉल्व जागीच पूर्णपणे तुटला असून, पाईपलाईनलाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे. परिणामी, सोमाटणे येथून तळेगाव दाभाडे शहराला होणारा नियमित पाणीपुरवठा ठप्प झाला ( Water Supply) आहे.
Nakul Bhoir Murder : घरगुती कलहातून सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीने केला खून
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, ते सुरू आहे. मात्र, तुटलेली दाबनलिका आणि व्हॉल्व बदलण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी खालील भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे ( Water Supply) बंद राहणार आहे :
1. तुकाराम नगर
2. संपूर्ण कॉलनी परिसर
3. गाव भाग
4. स्टेशन परिसर
5. वडगाव फाटा ते जनरल हॉस्पिटल दरम्यानचा परिसर
दरम्यान, नगरपरिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी परिस्थितीची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात ( Water Supply) येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.























