situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade Crime News : तळेगाव दाभाडे येथे 22 वर्षीय तरुणीचा तलावात मृतदेह; हरवल्यापासून काही तासांतच दुर्दैवी घटना उघडकीस

Updated On:
Talegaon Dabhade Crime News

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे शहराला हादरवून सोडणारी (Talegaon Dabhade Crime News)घटना रविवारी रात्री उघडकीस आली. साक्षी कांतीकुमार भावर (वय 22  रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे मावळ, मूळगाव बऊर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी रविवारी(दि .24) सायंकाळ पासून  बेपत्ता झाल्यानंतर  रात्री 11 ते 11.30 दरम्यान  तिचा मृतदेह तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनजवळील तलावातून मिळाला.

Pune: स्वरमयी बैठकीत पंडित संजय गरुड यांचे सुश्राव्य गायन

मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी फोन  लावून ही फोन  उचलत नाही (Talegaon Dabhade Crime News) शिवाय ती कुठे मिळत नसल्याने व घरी न परतल्याने तिच्या नातेवाइकांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिस निरीक्षक प्रविण कांबळे व पोलीस उपनिरीक्षक भरत वारे यांनी तत्काळ लोकेशन तपासले असता ते स्टेशन लगतच्या तलाव परिसरात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने तलाव परिसरात शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, तलावाच्या काठावर साक्षीची बॅग व मोबाईल आढळून (Talegaon Dabhade Crime News)आला. तपासणीदरम्यान तरंगणारे बूट दिसल्याने संशय बळावला. वारे यांनी तात्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना संपर्क केला. संस्थेची आपत्ती व्यवस्थापन टीम अल्पावधीतच घटनास्थळी दाखल झाली.

संस्थेचे सदस्य राजेंद्र बंडगे व गणेश गायकवाड यांनी तलावाच्या (Talegaon Dabhade Crime News)पाण्यात शोध घेतला असता, साक्षीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. तिचा भाऊही घटनास्थळी उपस्थित असल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात  यश आले. तिला तात्काळ सीपीआर देऊन तिला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र फार उशीर झाल्यामुळे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर  रुग्णवाहिकेतून तिला  हॉस्पिटलला नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Rashi Bhavishya 25 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्याची  कारवाई वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, शुभम काकडे, गणेश गायकवाड, राजेंद्र बंडगे, राजू सय्यद व अनिश गराडे यांनी केली. साक्षी परिधान केलेल्या टी-शर्टवरून ती रिलायन्स डिजीटलमध्ये कार्यरत असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून, ही घटना अपघात आहे की आत्महत्या याचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता तक्रारीपासून अवघ्या काही तासांतच मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात (Talegaon Dabhade Crime News) आहे.

Follow Us On