मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथे सायबर फसवणुकीचा (Talegaon Cyber Fraud) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्सअप खात्याचा ताबा घेत फसवणूक करणाऱ्या टोळीने त्यांच्या मित्रपरिवाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
घटना कशी घडली?
मंगळवार (दि. 9 सप्टेंबर) दुपारी तळेगावातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या परिचित (Talegaon Cyber Fraud) कलाकाराच्या नावाने व्हॉट्सअपवर संदेश आला – “I need your help”. त्यांनी चौकशी केली असता पलीकडून उत्तर आले की, “माझ्या एका मित्राला १० हजार रुपये पाठवायचे आहेत, पण माझ्या खात्यातून जात नाहीत. तुम्ही मदत करा, मी उद्या सकाळी परत देतो”.
Pune: ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ;नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती
मित्राला अडचण आल्याचे समजून त्यांनी होकार दिला. सुरुवातीला (Talegaon Cyber Fraud) एक नंबर देण्यात आला, पण ट्रान्स्फर होत नव्हता. नंतर दुसरा मोबाईल नंबर देऊन त्यावर गुगल पे करण्यास सांगितले. शेवटी पैसे ट्रान्स्फर झाले व काकांनी त्याचा स्क्रीनशॉट पाठवला.
यानंतर रात्री आठच्या सुमारास त्यांना पुन्हा मेसेज आला – “एक सहा आकडी कोड तुमच्या (Talegaon Cyber Fraud)मोबाईलवर चुकून आला आहे, तो मला लगेच पाठवा”. तो कोड प्रत्यक्षात त्यांच्या व्हॉट्सअप खात्याचा व्हेरिफिकेशन कोड होता. त्यामागचे गुपित न कळल्याने काकांनी भोळेपणाने तो कोड पाठवला. काही क्षणातच त्यांच्या व्हॉट्सअप खात्याचा ताबा हॅकर्सने घेतला.
Lonavala Protest : लोणावळ्यात राष्ट्रपुरुष शिल्प तोडफोड प्रकरणी सर्वपक्षीय दणका मोर्चा
हॅक झाल्यानंतर लगेचच त्यांच्या सर्व संपर्कांना व ग्रुपस ना“I need your help” असा मेसेज (Talegaon Cyber Fraud) पाठवून पैशांची मागणी सुरू झाली. काकांच्या नातेवाईक व मित्रांची संख्या २००० पेक्षा अधिक असल्यामुळे अनेकांना एकाच वेळी संदेश पोहोचला. त्यातील काहींनी चौकशी न करता पैसेही ट्रान्स्फर केले.
परंतु शंका घेतलेल्या काही मित्रांनी काकांना फोन करून खात्री करून घेतली. दरम्यान काकांनी दुसऱ्या सिमकार्डवरून नवीन व्हॉट्सअप सुरू करून आप्तेष्टांना त्वरित (Talegaon Cyber Fraud)सावध केले.
सायबर सेलची मदत
दुसऱ्या दिवशी (दि. 10 सप्टेंबर) सकाळी काकांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथे नुकतेच सुरू झालेल्या सायबर सेलमध्ये अधिकारी श्री. इंगळे यांनी त्यांना मार्गदर्शन(Talegaon Cyber Fraud) केले. ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली व संध्याकाळी ६.३० वाजता सायबर क्राईम मुख्य कार्यालयातून संदेश आला की “तक्रार प्राप्त झाली असून पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यास वर्ग करण्यात आली आहे”. सायबर क्राईम विभागाच्या प्रयत्नांमुळे अखेरीस त्या ज्येष्ठ नागरिकांचे व्हॉट्सअप खाते परत मिळाले.
पोलीस व तज्ज्ञांचा इशारा
या प्रकरणानंतर सायबर सेलने नागरिकांना विशेष सूचना दिल्या आहेत – (Talegaon Cyber Fraud)
कोणतीही व्यक्ती (जवळची असली तरी) सोशल मीडियावर पैशांची मागणी करत असल्यास तात्काळ प्रत्यक्ष फोन करून खात्री करून घ्यावी.
मोबाईलवर आलेला OTP, सहा आकडी कोड, पासवर्ड कधीही दुसऱ्याला देऊ नये.
अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा अनोळखी नंबरवर पैसे पाठवू नयेत.
ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, कारण त्यांना अशा फसवणुकीचे बळी बनवले जाते.
शंका आल्यास लगेच सायबर हेल्पलाइन १९३० किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
थोडे दुर्लक्ष किंवा घाईमुळे मोठी फसवणूक होऊ शकते. फसवणूक करणारे समाजमाध्यमांचा गैरवापर करून भावनांशी खेळतात. त्यामुळे सजग राहणे, शंका घेतल्यास त्वरित पडताळणी करणे आणि सायबर सेलशी संपर्क करणे हेच एकमेव उपाय (Talegaon Cyber Fraud) आहेत.