मावळ ऑनलाईन – मावळ तालुका सोमटणे गावातील उदयोन्मुख बॉक्सर स्वरा मुऱ्हे ( Swara Murhe)हिने आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गेल्या चार वर्षांपासून ती अरींजय मार्शल आर्ट्स व स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत असून, रविवारी झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षात तिने ब्राऊन बेल्ट मिळवला.
MLA Sunil Shelke : टाकवे बु., फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा
या बेल्टसाठी स्वरा गेल्या सहा महिन्यांपासून कठोर सराव करत ( Swara Murhe)होती. तिच्या या यशानंतर आता ती १३ सप्टेंबर रोजी सातारा येथे होणाऱ्या ‘अस्मिता खेलो इंडिया’ किक बॉक्सिंग स्पर्धेत मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तिच्या या कामगिरीबद्दल शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्वराच्या यशामागे संघटनेचे अध्यक्ष यशवंत माने, मुख्य कोच संदीप माने आणि अथर्व कावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ( Swara Murhe) आहे.




















