मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्पर्श हॉस्पिटल (Sparsh Hospital), सोमाटणे फाटा यांच्या वतीने हॉस्पिटलमध्ये २२ जुलै ते २७ जुलै २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, मावळ विधानसभेचे आमदार सुनील आण्णा शेळके, तसेच भाजप मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
Talegaon Dabhade: यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करावा – कन्हैया थोरात
या शिबिरात (Sparsh Hospital) हृदयरोग, मेंदू व मणका विकार , कर्करोग व रक्तविकार तपासणी व शस्त्रक्रिया , मूत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग उपचार , मधुमेह, पोट विकार, अस्थिरोग व सांधे प्रत्यारोपण , नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन , कान-नाक-घसा विकार तपासणी , मोफत डायलेसिस व एक्स-रे सेवा खालील सर्व तपासण्या आणि शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.
Sant Tukaram Palkhi : माऊलींच्या अनुपम भेट सोहळ्यानंतर संत तुकोबारायांचे देहुकडे प्रस्थान
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे हा असून, स्पर्श हॉस्पिटलच्या आरोग्यवर्धक आणि जनहितकारी या उपक्रमात मावळ तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.