मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील परंदवडी ते उर्से रोडवर समर्थ नर्सरी समोर तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक (Shirgaon Crime News) केली. त्याच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई गुरुवारी (२४ जुलै) रात्री करण्यात आली.
Dr. Medha Kulkarni : प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी संसदरत्न पुरस्काराने सन्मानित
ऋषिकेश उर्फ शे-या राजू अडागळे (२४, उर्से, मावळ,) आणि आकाश अरमुर्गम पिल्ले (२२, देहूरोड) यांना अटक करण्यात आली आहे, तर एक अनोळखी इसम फरार आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित शिंदे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Shirgaon Crime News) आहे.
Borghat Accident: बोरघटात विचित्र अपघात, 8 ते 10 वाहने एकमेकांना धडकली, महिलेचा मृत्यू तर 16 जण जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक ऋषिकेश अडागळे हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार असतानाही कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्याचा मित्र आरोपी आकाश पिल्ले आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार यांच्यासह उर्से परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कोयते बाळगताना आढळून आला. तो येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना कोयते दाखवून दहशत निर्माण करत होता. शिरगाव पोलीस (Shirgaon Crime News) तपास करत आहेत.