मावळ ऑनलाईन –गुरुपौर्णिमा ते शिक्षक दिन ( Saraswati Vidyamandir)यादरम्यान सरस्वती शिक्षण संस्थेतर्फे संस्थेत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी सत्कार करण्यात येतो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सरस्वती शिक्षण संस्थेतर्फे संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी गौरवण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत अधिकारी व प्रसिद्ध उद्योजक स्वप्निल फाउंडेशन चे संचालक श्री अनिल वळसंगकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, खजिनदार सुचित्रा चौधरी ,कार्यकारिणी सदस्य विश्वास देशपांडे, सदानंद कुलकर्णी , मिलिंद सदावर्ते , माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक नवनाथ गाढवे, इंदोरी विभाग प्राथमिक मुख्याध्यापक नितीन शिंदे, बालवाडी तळेगाव विभाग प्रमुख सोनाली काशीद ,इंदोरी बालवाडी विभाग प्रमुख अर्चना एरंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनिल वळसंगकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाले.
स्तवन अस्मिता ढावरे, आशा गायकवाड यांनी सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी केले .
Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त
Chakan: इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर घरात शिरून विवाहितेवर बलात्कार;पोलिसावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
प्रमुख अतिथींची ओळख माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी मॅडम यांनी करून दिली. ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा म्हणजे शिक्षक. शिक्षकांच्या ज्ञानदानामुळेच विद्यार्थ्यांनी आजवर विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. या पवित्र ज्ञानदानाच्या कार्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. स
रस्वती शिक्षण संस्थेच्या हितचिंतकांनी दिलेल्या देणगीतून बालवाडी ते माध्यमिक विभागातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पारितोषिके देण्यात आली. यात निता शिंदे ,वनिता गायकवाड ,अस्मिता ढावरे , आशा गायकवाड, सुनीता कुलकर्णी, संजय गायकवाड , कल्याणी जोशी, अर्चना एरंडे रत्नमाला भुजबळ, वृषाली झेंड व ती सारिका जाधव यांना आदर्श शिक्षक/ शिक्षकेतर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
.देणगीदार पुरस्कृत प्राप्त पारितोषिकांचे वाचन सविता केंगले- भोकटे केले. पारितोषिक प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वळसंगकर यांनी अत्यंत कौशल्यतेने सरस्वती शिक्षण संस्थेतील प्रत्येक शिक्षकाच्या मनात सुवर्ण महोत्सवी वर्षानंतर ची शाळा कशी असेल याबद्दल शिक्षकांची चर्चा केली व शिक्षकांना मार्गदर्शनही केले.
आभार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे मानले. कल्याणी जोशी यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता कुलकर्णी यांनी केले.