Team MyPuneCity –कात्रज परिसरात दरोड्याच्या (Pune Crime News 25 April 2025)तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला आंबेगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ७.३० वाजता गंधर्व लॉन्स, पुणे-सातारा रोड, कात्रज येथील मोकळ्या जागेत करण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सौरभ गोरक्ष चौधरी (वय २३, रा. जयशंकर कॉलनी, अंजनीनगर), ओंकार महादेव देवकते (वय २२, रा. संतोष नगर, कात्रज), रघुनाथ प्रकाश मटकट्टे (वय १८) आणि दोन विधीसंघर्षीत बालकांचा समावेश आहे.
या टोळीने संगनमत करून प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करत लोखंडी कोयता, मिर्ची पावडर, दोरी असे एकूण ४०,२३० रुपयांचे साहित्य बेकायदेशीररित्या जवळ ठेवले होते. ते लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी सज्ज होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच कारवाई करून संभाव्य गुन्हा रोखला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी करत आहेत.
Terrorist Attack : दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचाव्यात – प्रशांत दिवेकर
वारजेतील एटीएममध्ये फसवणूक करून दोघांनी काढले ३५,८०० रुपये
वारजे येथील एटीएममध्ये छेडछाड करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी एकूण ३५,८०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी नितीन महाजन (वय ५७, रा. कोथरूड) यांच्या तक्रारीवरून वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींची नावे संतोषी कुमार किशोरीलाल सरोज (रा. पुणे, मूळ रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) आणि प्रदीपकुमार नंदकिशोर मोर्य (वय २८, मूळ रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) अशी आहेत.
आरोपींनी एनडीए रोडवरील पिताकुंज बिल्डिंगमधील जनसेवा सहकारी बँकेच्या एटीएममध्ये काळ्या रंगाचा फ्लॅप लावून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारला. त्यांनी मशीनमध्ये छेडछाड करून पैसे ग्राहकांपर्यंत न पोहोचता फ्लॅपवर साठवले व नंतर स्वतः काढून घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे करत आहेत.
नवी पेठेत सकाळी फिरणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावला
सकाळी चालत असलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून एक अज्ञात दुचाकीस्वार पसार झाल्याची घटना नवी पेठेतील गांजवे चौक ते पत्रकार भवन दरम्यान २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६.१० वाजता घडली.
फिर्यादी महिला (वय २४, रा. सदाशिव पेठ) या रस्त्याने चालत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील १०,००० रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पलायन केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अमलदार शेडजाळे पुढील तपास करत आहेत.
बंडगार्डनमध्ये कारमधून १.६४ लाख रुपयांचा ऐवज लंपास
बंडगार्डन परिसरातील उडपी रेस्टॉरंटजवळ उभी असलेल्या कारमधून अज्ञात चार इसमांनी १.६४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.५० ते ७.२५ च्या दरम्यान घडली.
फिर्यादी नवनाथ काकडे (वय ४२, रा. काकडे मळा, थेऊर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कार धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाजवळ पार्क करून कार्यालयात गेले होते. त्या वेळी कारमध्ये असलेल्या त्यांच्या चालकाचे लक्ष विचलित करून चोरट्यांनी गाडीचा दरवाजा उघडून काळ्या रंगाची ब्रिफकेस चोरली. त्यात १ लाख रुपये रोख, महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य होते. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहायक फौजदार विजय सावंत तपास करत आहेत.
स्वारगेट एसटी स्टँडमध्ये गर्दीचा फायदा घेत सोन्याचे मंगळसूत्र चोरी
स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील ४५,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले. ही घटना २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८.१५ वाजता घडली.
फिर्यादी महिला (वय ४२, रा. ठाणे, मुंबई) या पुण्याहून प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.