Team MyPuneCity –- मगरपट्टा रोडवरील एका वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल १३ लाख ९२ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ( Pune Crime News 21 April 2025) आला आहे.
फिर्यादीच्या वडिलांची देखभाल करण्यासाठी नेमलेला ६६ वर्षीय केअरटेकर, याने त्यांच्या मोबाईलमधून बँकेस लिंक असलेले सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये घालून त्यावर युपीआय क्रमांक तयार केला. यानंतर वृद्धाच्या खात्यातून विविध बँक खात्यांमध्ये परस्पर पैसे ट्रान्सफर करत एकूण १३,९२,००० रुपयांचा अपहार करण्यात आला. या घटनेची नोंद २४ डिसेंबर २०२४ रोजी झाली होती.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करीत आहेत.
२. कात्रजमध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून ( Pune Crime News 21 April 2025)
कात्रज, पुणे: साईछत्र अपार्टमेंटजवळ जागेच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.
शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा. कात्रज) याच्यावर संशयित आरोपीसह इतर तीन अनोळखी इसमांनी मारहाण केली आणि त्याला ठार मारले. मृतकाच्या कुटुंबीयांनी संतोषनगर येथील ४६ वर्षीय इसमाविरुद्ध फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर करत आहेत.
३. धनकवडीमध्ये बंद घरात चोरी; १.७५ लाखांचा ऐवज लंपास( Pune Crime News 21 April 2025)
धनकवडी, पुणे: तीन हत्ती चौकाजवळील प्रकृती अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १.७५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
२० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत ही चोरी घडली. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून रोकड रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १,७५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.
४. रिक्षा भाड्यावरून वाद; तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला( Pune Crime News 21 April 2025)
हडपसर, पुणे: दत्त मंदिराजवळील गाडीतळ रिक्षा स्टँड येथे प्रवासी भरण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणावर चार इसमांनी लोखंडी हत्याराने जीवघेणा हल्ला केला.
१९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादीच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. पोलिसांनी एका इसमाला ओळखले असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करीत आहेत.
५. पाण्याच्या बहाण्याने मोबाईल व रोकड हिसकावून लुट ( Pune Crime News 21 April 2025)
शिवाजीनगर, पुणे: रोकडोबा मंदिराजवळ २२ वर्षीय तरुणाला पाणी मागण्याच्या बहाण्याने चार इसमांनी अडवून त्याच्या खिशातील मोबाईल फोन व ७,५०० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले.
ही घटना २० एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५:२० वाजता घडली. आरोपींनी तक्रारदाराच्या नकळत अचानक मोबाईल आणि रोकड हिसकावली व घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करत आहेत.