मावळ ऑनलाईन –इंदोरी- गणेशोत्सव व गौरीपूजनाच्या(Prashant Bhagwat) पारंपरिक सणाला नव्या उत्साहाची जोड मिळण्यासाठी प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
“आमची गौराई… आमचा अभिमान!” या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावोगावी सजावट व सर्जनशीलतेला नवी झळाळी मिळत आहे.
या स्पर्धेत विजेत्यांसाठी खास बक्षिसे देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक – फ्रिज
द्वितीय क्रमांक – पिठाची गिरणी
तृतीय क्रमांक – वॉशिंग मशीन
चतुर्थ क्रमांक – फूड प्रोसेसर
पाचवा क्रमांक – स्मार्टफोन
तसेच गॅस शेगडी, कुलर, मिक्सर, टेबल फॅन, इस्त्री अशी प्रोत्साहनपर बक्षिसेदेखील ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेचे खालील प्रमाणे नियम व अटी असणार आहेत
- स्पर्धा केवळ इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील गावांपुरती मर्यादित असेल.
- १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२५ दरम्यान स्पर्धा पार पडेल.
- स्पर्धकांनी QR कोड स्कॅन करून किंवा 9090991020 वर नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि सजावटीचे फोटो/व्हिडिओ पाठवणे आवश्यक.
- फोटो व व्हिडिओ Facebook व Instagram वर अपलोड करून Prashant Bhagwat (prashantbhagwatofficial) या अधिकृत पेजला टॅग करणे बंधनकारक.
- निकाल ७ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. ऑनलाइन पद्धतीने फेसबुक व इंस्टाग्रामवर जाहीर केला जाईल.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
त्याचप्रमाणे या स्पर्धेत माळवाडी, तळेगाव (ग्रा.), नवलाख उंब्रे, जाधववाडी, बधलवाडी, मिढेवाडी, सुदवडी, सुदुंबरे, आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी, राजपुरी, सांगवी, नानोली, वराळे, मोहितेवाडी, साते, बाम्हणवाडी, जांभुळ, इंदोरी, जांबवडे येथील नागरिकांना सहभाग घेता येईल.
Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त
Chakan: इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर घरात शिरून विवाहितेवर बलात्कार;पोलिसावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


या स्पर्धेविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार प्रशांतदादा भागवत म्हणाले ,“गणेशोत्सव हा एकतेचा, श्रद्धेचा आणि सर्जनशीलतेचा सण आहे. या स्पर्धेतून घराघरातील कौशल्य आणि भक्तिभाव उभा राहील. गावोगावील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, हीच अपेक्षा आहे.”
