मावळ ऑनलाईन –प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी (Prashant Bhagwat)खास पर्व म्हणून “मनोरंजन संध्या २०२५” हा भव्य कार्यक्रम जांभूळ येथे अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास जांभूळ परिसरातील माता-भगिनींनी प्रचंड प्रतिसाद दिला. हसत-खेळत, गाणी, नृत्य आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांनी आपला लपलेला कलाविष्कार सादर करत रंगतदार वातावरण निर्माण केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रशांतदादा भागवत हे आमदार सुनील अण्णा शेळके यांचे विश्वासू शिलेदार असून, सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांच्या पुढाकारातून महिलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावोगावी त्यांना प्रचंड जनसमर्थन लाभत आहे. “मनोरंजन संध्या”च्या माध्यमातून त्यांनी महिलांशी आत्मीय संवाद साधत, समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
Teacher App : शिक्षकांच्या अध्ययनासाठी डिजिटल सक्षमीकरण ॲप
PMC : महापालिकेचा मोठा निर्णय: जुन्या भुयारी मार्गाचे रुंदीकरण, वाहतुकीला नवा श्वास


कार्यक्रमाला तालुका युवक अध्यक्ष किशोर भाऊ सातकर, आदर्श सरपंच संतोष भाऊ जांभुळकर, उपसरपंच एकनाथ आप्पा गाडे, उपसरपंच अंकुश भाऊ काकरे, सरपंच नागेश ओव्हाळ, मावळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष सुशांत बालगुडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य रुपाली गायकवाड, स्नेहल ओव्हाळ, तृप्ती जांभुळकर, कल्पना काकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ईश्वर काकरे, प्रभाकर जांभुळकर, संजू जांभुळकर, विवेक काकरे, अरुण जांभुळकर, संदीप गाडे, भानुदास शिंदे, तसेच हिंदुतेज मित्र मंडळाचे सर्व सभासद उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांमध्ये — प्रथम क्रमांक शिल्पाताई पोटवडे, द्वितीय क्रमांक अश्विनीताई पोटवडे, तृतीय क्रमांक जयश्रीताई देशमुख, चतुर्थ क्रमांक जनाबाई जांभुळकर, पाचवा क्रमांक प्रतीक्षा ताई काकरे, सहावा क्रमांक शितलताई वायकर, सातवा क्रमांक वैष्णवीताई जांभुळकर, आठवा क्रमांक पुष्पाताई देशमुख, नववा क्रमांक मोनिकाताई जांभुळकर आणि दहावा क्रमांक रोहिणीताई काकरे यांनी पटकावला.
या भव्य आयोजनामुळे जांभूळ परिसरात आणि संपूर्ण मावळ तालुक्यात प्रशांतदादा भागवत यांच्या कार्यपद्धतीबद्दल नव्या उत्साहाची लाट उसळली आहे. महिलांच्या सहभागातून उभे राहिलेले हे यश, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांतदादा भागवत यांच्या बाजूने पोषक वातावरण निर्माण करणारे ठरले आहे.