मावळ ऑनलाईन –मुसळधार पावसामुळे पवना धरण जलाशय सध्या (Pawana Dam) 100 % भरलेले आहे. परिणामी नदीपात्रात विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे. नदीपात्रात जलविद्युत केंद्राद्वारे 1400 क्युसेक तर सांडव्याद्वारे 10500 क्युसेक असा एकूण 11900 क्युसेक विसर्ग चालू आहे.
पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून, मोठा येवा धरणात प्राप्त होत आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज रात्री 20:30 वा. सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होवून 14370 क्युसेक केला जाण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर एकूण विसर्ग 15000 क्युसेक इतका राहील.
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील 4 ही धरणे सरासरी 96 टक्कांवर, पाणीसाठा वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Eknath Shinde : राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे. असे सांगण्यात आले.