Team MyPuneCity –दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर, पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटक तेथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर तातडीची प्रतिक्रिया देत जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला ( Pahalgam terrorist attack) आहे.
या नियंत्रण कक्षामार्फत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी संपर्क व माहिती संकलन सुरू करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पहलगाम परिसरातून ८४ पर्यटकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असून त्यांच्या सर्व माहितीचा तपशील राज्य आपत्ती नियंत्रण केंद्र, मंत्रालय यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
ज्यांचे नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती पहलगाम परिसरात अडकले असल्याची शंका असल्यास, खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले ( Pahalgam terrorist attack) आहे.
हेल्पलाइन/संपर्क क्रमांक:
- जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी: 020-26123371
- मोबाईल: 9370960061
नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत संपर्कावर माहिती देणे व आवश्यक ती मदत घेणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले ( Pahalgam terrorist attack) आहे.