मावळ ऑनलाईन – पिंपरी चिंचवड परिसरात सामाजिक कार्य करणारे नकुल आनंदा भोईर ( Nakul Bhoir Murder) यांचा त्यांचीच पत्नी चैताली भोईर हिने गळा आवळून खून केला आहे. हा धक्का दायक प्रकार गुरुवारी (दि.23) घडला. हा खून घरगुती कलहातून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नकुल आणि चैताली भोईर यांच्यात मध्यरात्री उशिरा घरात वाद झाला. नकुल भोईर हे गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. या संशयावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. मंगळवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात तीव्र वाद झाला आणि रागाच्या भरात चैतालीने कपड्याने नकुलचा गळा आवळून खून केला, असे पोलिस तपासात प्राथमिक निष्पन्न ( Nakul Bhoir Murder) झाले आहे.
Shri Kshetra Bhandara: श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला होणार यावर्षीचा माघ शुद्ध दशमी सोहळा
घटनेनंतर चैताली भोईर हिने स्वतः पोलिसांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व तिला ताब्यात घेतले. सदर प्रकरणाचा तपास चिंचवड पोलीस ठाण्याचे पथक करत असून, नकुल भोईर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला ( Nakul Bhoir Murder) आहे.
नकुल भोईर हे चिंचवड परिसरातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पवना नदी सुधार प्रकल्पाविरोधात जनआंदोलन उभारले होते तसेच स्थानिक प्रश्नांवर नेहमीच भूमिका घेत नागरिकांच्या बाजूने उभे राहिले होते. अलीकडेच ते आणि त्यांची पत्नी चैताली भोईर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते. दोघांचा प्रचारही सुरू झाला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मोरया गोसावी मंदिराजवळ पाडवा निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात चैताली भोईर यांच्या प्रचारासाठी मोठमोठ्या होर्डिंग्ज लावण्यात आल्या ( Nakul Bhoir Murder) होत्या.
मात्र, या राजकीय आणि सामाजिक गतीच्या पार्श्वभूमीवर घरगुती कलह वाढत गेला आणि अखेर या वादातून हा खून घडला.चैताली भोईरला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून घरगुती वाद आणि संशयास्पद मतभेद हेच या खुनामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. चिंचवड शहरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात ( Nakul Bhoir Murder) आहे.



















