मावळ ऑनलाईन – राजकारणात कट्टर विरोधक म्हणून ( MLA Sunil Shelke) ओळखल्या जाणारे मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे या ‘मामा-भाच्या’च्या जोडीने अखेर एकाच मंचावर ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची झलक दाखवली. तळेगाव नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे दृश्य पाहायला मिळाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांच्या समक्ष झालेल्या या मिलनामुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यातच बाळा भेगडे यांनी आगामी निवडणुका बिनविरोध करण्याचा आशावाद व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तळेगाव दाभाडे नगर परिषद इमारतीसह तालुक्यातील ७६१ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ व आमदार सुनील शेळके यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तळेगाव दाभाडे येथे भव्य कार्यक्रम संपन्न झाला. सन २०१९ नंतर पहिल्यांदाच माजी राज्यमंत्री भेगडे हे आमदार शेळके यांनी आयोजित केलेल्या व शेळके यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. सुनील शेळके हे बाळा भेगडे यांना उद्देशून म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊ. मी हात पुढे केला आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला हात मिळवायचा आहे कि नाही. त्यावर बोलताना भेगडे म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही एक हात पुढे केला तर आम्ही दोन हात पुढे करू. आगामी निवडणुकांमध्ये संपूर्ण तालुका बिनविरोध करू. यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजकीय मतभेदांतून आलेल्या त्यांच्या नात्यात नव्या सलोख्याची झलक दिसली. सुनील शेळके यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.
Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड
मागील विधानसभा निवडणुकीत भेगडे यांनी भाजप नेते असूनही महायुतीच्या निर्णयाविरुद्ध जाऊन सुनील शेळके यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्या नात्यातील तणाव विकोपाला गेला होता. मात्र, आता दोघांच्या या जवळीकीमुळे मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्या दिशेने वळण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार शेळके म्हणाले, “राजकारण बाजूला ठेवून जर मावळच्या विकासासाठी बाळा भेगडे यांनी टाळी दिली, तर तालुक्याचा आणखी वेगाने विकास साधता येईल.”त्यावर प्रत्युत्तर देताना भेगडे म्हणाले, “तालुक्यातील निवडणुका बिनविरोध करून महिलांना विमान प्रवास घडवू; आणि कार्यकर्त्यांनाही देश-विदेशात नेऊ.” या निमित्ताने मावळातील विरोधी राजकीय पक्षांमधील ‘दूर’ आता ‘सूर’ मध्ये बदलल्याचे चित्र लोकांनी अनुभवले.
या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री भेगडे यांचे कार्यक्रमास( MLA Sunil Shelke) उपस्थित राहिल्याबद्दल विशेष आभार मानत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, निवडणुकीसाठी मी हात पुढे करतो, आता टाळी द्यायची की नाही हे तुम्ही ठरवा असे थेट आवाहन भेगडे यांना केले. यावर बोलताना माजी राज्यमंत्री भेगडे यांनीही तुम्ही एक हात पुढे केला तर आम्ही दोन हात पुढे करू आणि तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत बिनविरोध करू, असे जाहीर करत आमदार शेळके यांच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद दिला.
दरम्यान, आमदार शेळके यांनी केलेले आवाहन आणि माजी राज्यमंत्री भेगडे यांनी त्यास दिलेला प्रतिसाद तसेच या कार्यक्रमाला आवर्जून लावलेली उपस्थिती यामुळे मावळ तालुक्यातील येत्या दोन महिन्यांत होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी समीकरणे जुळून तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार ? अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.
या आमदार व माजी राज्यमंत्री दोघांच्या वक्तव्यामुळे तालुक्यातील गावा- गावात आणि सर्वच राजकीय पक्षात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. खरेच हे दोघेजण आणि त्यांचे पक्ष एकत्रित येतील का? असा प्रश्न तालुक्यातील मुरब्बी राजकारण्यांकडून चर्चिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते यांच्यामध्ये संभ्रम आणि गोंधळ ( MLA Sunil Shelke) निर्माण झाला आहे.
आत एक आणि बाहेर एक असे वक्तव्य करणारे दोघेजण ओठात एक आणि पोटात एक असे वागतात की काय? समजत नाही त्यामुळे भविष्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका राहील हे लवकरच उघड होईल. की केवळ वेळ मारून नेण्यासाठी किंवा सभेत टाळ्या वाजवून घेण्यासाठी ही स्टंटबाजी होती की काय? अशीही रंगतदार चर्चा सार्वजनिक ठिकाणी होत आहे. या दोघांनी ही स्टंटबाजी बंद करून खरी आणि वस्तुस्थिती याबाबत भान ठेवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचे थांबवावे असे अनेक प्रश्न या निमित्ताने तालुकाभर चर्चेला येत ( MLA Sunil Shelke) आहे.



















