मावळ ऑनलाईन – किरकोळ कारणावरून (Maval Crime News)दोन गटांमध्ये मारहाण झाली. ही घटना मावळातील आतवण या गावी मंगळवारी दुपारी घडली.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन महिलांनी या प्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे पहिल्या फिर्यादीनुसार रोहिदास मिळणे याचा लहान भाऊ व मेहुना तसेच पाच ते सहा महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे फिर्यादीत म्हटले आहे की , जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर रित्या जमा जमवला व चप्पल बेल्ट व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी केली.
Lonavla Rain : लोणावळ्यात 24 तासात 432 मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत
Alandi : इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ; नदीपात्रातील पाणी शनी मंदिरापर्यंत
याच्या परस्पर विरोधी तक्रार दाखल केली असून यामध्ये शिवाजी मार्ग टाकवे संजल शिवाजी टाकवे विठ्ठल टाकवे यश टाकवे व दोन महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हे फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी यांचे स्नॅक्स सेंटर आहे. या दुकानावर आलेल्या ग्राहकांना आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व यावरून बेकायदेशीर जमाव जमवून त्यांनी फिर्यादी यांच्याशी भांडण करत मारहाण केली यावरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.























