मावळ ऑनलाईन – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ( Maval NCP ) तसेच लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून उमेदवारी मागणी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) मागविण्यात आले असून इच्छुकांच्या प्रचंड संख्येमुळे पक्षांतर्गत मोठी स्पर्धा दिसून येत आहे.
MLA Sunil Shelke : मावळ मधील राजकीय समीकरणे बदलणार; मामा भाच्याचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’
आमदार सुनिल शंकरराव शेळके आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निवडणुकांसाठी संबंधित आरक्षण निश्चित झाले असून, पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज स्थानिक अध्यक्षांकडे जमा करावेत.
लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक
उमेदवारांनी आपले अर्ज रवि दत्तात्रय पोटफोडे, अध्यक्ष लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( Maval NCP ) यांच्याकडे जमा करावेत.वडगाव नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज प्रविण ढोरे, अध्यक्ष वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या कडे स्वीकारले जाणार आहेत.
तसेच मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खालील ( Maval NCP ) विभागीय अध्यक्ष रूपेश घोजगे अध्यक्ष, आंदर मावळ, भरत भोते अध्यक्ष, पवन मावळ (पूर्व विभाग), लाला गोणते अध्यक्ष, पवन मावळ (पश्चिम विभाग), साईनाथ गायकवाड अध्यक्ष, नाणे मावळ, निलेश दाभाडे अध्यक्ष, कामशेत शहर, दिनेश चव्हाण अध्यक्ष, इंदोरी शहर यांच्या कडून अर्ज घ्यावेत. उमेदवारी अर्ज पूर्ण भरून संबंधित अध्यक्षांकडे जमा करावेत.
तसेच पक्षाची निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठीचे यापूर्वीच इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागविले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगाव दाभाडे शहर कार्ड कमिटीने ८३ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करून त्यांचा अहवाल मावळचे आमदार सुनील शेळके व तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्याकडे दिलेला ( Maval NCP ) आहे.



















