मावळ ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या ( Maval Crime News) एकाला बेकायदेशीररित्या तीन किलोहून अधिक गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास सोमाटणे फाटा ते परंदवडी रोडवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुलाजवळ करण्यात आली.
Talegaon Dabhade Crime News : वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत, दोघांना अटक
याबाबत पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय घनश्याम भालेराव (३१, रावेत) याला अटक करण्यात( Maval Crime News) आली आहे.
Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी अक्षय भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३१२३ ग्रॅम वजनाचा, १,५६,१५० रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगलेला आढळून आला. आरोपीला यापूर्वीच पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने तडीपारीचा आदेश रद्द न करता किंवा परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. आरोपीने हा गांजा धुळे येथून स्वतः जाऊन आणल्याचे सांगितले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस ( Maval Crime News) तपास करत आहेत.