मावळ ऑनलाईन –सुदवडी गावात अवैधरित्या ( Maval Crime News) हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (२३ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजता ओढ्याच्या काठावर करण्यात आली.
या प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अंदाजे ६० वर्षीय महिलेवर गुन्हा नोंदविला आहे. ती येलवाडी, हवेली येथे राहत असून ती फरार ( Maval Crime News) आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सुदवडी गावच्या हद्दीत छापा टाकला असता, लोखंडी टाकीत सुमारे ४ हजार लिटर गूळ-मिश्रित कच्चे रसायन आणि तयार हातभट्टीची दारू असा २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी दारू निर्मितीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले असून आरोपी महिलेस शोध सुरू आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत ( Maval Crime News) आहेत.





















