मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील इंदोरी येथे विरुद्ध दिशेने आलेल्या बसने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (२ जुलै) रात्री अकरा वाजताच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवर प्रशांत पेट्रोल (Maval Crime News) पंपासमोर घडली.
Pimpri Chichwad Crime News 04 July 2025 : गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक
अमोल मदन विश्वास (५१, इंदोरी, मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस (एमएच १४/सीडब्ल्यू ८१८१) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल (Maval Crime News) करण्यात आला आहे.
Murder : ठाकरसाई येथे डोक्यात कुदळ घालून सहकारी कामगाराचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल विश्वास आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून तळेगाव-चाकण रोडने जात होते. इंदोरी येथे प्रशांत पेट्रोल पंपासमोर आरोपी बस चालक त्याच्या ताब्यातील बस विरुद्ध दिशेने भरधाव वेगात चालवत आला. बसने अमोल यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात अमोल आणि त्यांचा मित्र दोघेही जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत (Maval Crime News) आहेत.