मावळ ऑनलाईन – मराठी नाट्यपरंपरेच्या समृद्ध वारशाच्या जपणुकीसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Marathi Natya Parishad) वतीने आयोजित गौरव सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश साखवळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा सोहळा कै. गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त पार पडला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार (Marathi Natya Parishad) प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आशीष शेलार म्हणाले, “नाट्यसंस्कृती हे आपल्या संस्कृतीचे मूलस्थान असून तिचा प्रसार आणि संवर्धन हे शासनाचे कर्तव्य आहे. शासन यासाठी कटिबद्ध आहे.”
पुरस्कार स्वीकारताना (Marathi Natya Parishad) सुरेश साखवळकर म्हणाले, “पु. ल. देशपांडे आणि छोटा गंधर्व यांच्या प्रेरणेतून मी रंगभूमीची सेवा केली,” अशी भावना व्यक्त केली. तर नीना कुळकर्णी यांनी आपल्या गुरूजनांचे आणि कुटुंबीयांचे आभार मानत, “नाट्यसेवा हीच माझा श्वास आहे,” असे भावनिक उद्गार काढले.
कार्यक्रमात ‘गोविंदायन’ या विशेष सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.
विविध विभागातील अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये ‘असेन मी नसेन मी’ हे व्यावसायिक नाटक आणि ‘संगीत आनंदमठ’ हे प्रायोगिक संगीत नाटक उत्कृष्ट ठरले.
अभिनय क्षेत्रात गौरवप्राप्त कलाकार:
सुव्रत जोशी, नीना कुळकर्णी, प्रशांत दामले, शर्मिला शिंदे
विशेष उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित (Marathi Natya Parishad):
मीनल कुलकर्णी, डॉ. गणेश चंदनशिवे, निहारिका राजदत्त
हा पुरस्कार सोहळा नाट्यक्षेत्रातील योगदानास मान्यता देत रंगभूमीच्या उज्ज्वल परंपरेला नवा सन्मान देणारा ठरला.