मावळ ऑनलाईन – प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठेत, चौधरी वडेवाले या खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी पर्यटकांच्या आरोग्याशी ( Lonvala) थेट खेळ होतोय, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खराब, कुजलेले आणि उंदरांनी कुरतडलेले बटाटे वापरून वडा तयार केला जात असल्याचा प्रकार एका सजग नागरिकाच्या लक्षात आला. त्याने तत्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून याबाबत तक्रार दाखल केली.
Lonavala Rain : लोणावळ्यात 24 तासांत 94 मिमी पावसाची नोंद; यंदा सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिस पोहोचेपर्यंत मुख्य आचारी तिथून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची तक्रार नोंदवत पुढील कारवाईसाठी आवश्यक ती माहिती जमा केली असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना यासंदर्भात लवकरच कळवले ( Lonvala) जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Alandi:आळंदी ग्रामीण भागामध्ये बिबट निवारण केंद्र टीमची पाहणी:स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन |
सदर प्रकारात जे बटाटे उकडले जात होते, ते अक्षरशः सडलेले, व उंदरांनी कुरतडलेले होते. तसेच त्यांना उकळण्यासाठी देखील गढूळ पाणी वापरले जात होते. त्यामुळे ( Lonvala ) अशा बटाट्यांपासून तयार होणारा वडा नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. या प्रकारामुळे लोणावळ्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या बाबतीतील गंभीर दुर्लक्ष स्पष्ट झाले आहे.
सदर ठिकाणी देश-विदेशातून हजारो पर्यटक दररोज येत असतात. अशा ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने बेपर्वा वागणं हे गंभीर स्वरूपाचं आहे. प्रशासनाने अशा अन्न विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी आणि येथील खाद्यपदार्थांची नियमित तपासणी व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत ( Lonvala) आहे.



















