मावळ ऑनलाईन – नऊ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त (Kranti Din) स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे स्मरण रहावे म्हणून सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे माध्यमिक विभागाने यशवंतनगर परिसरातून रॅली काढली. क्रांतिकारकांचा विजय असो, भारत माता की जय, जय जवान जय किसान जय विज्ञान व वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शिवाजी चौक व रेल्वे स्टेशन चौकात राष्ट्रगीत, राज्यगीत, देशभक्तीपर गीते इयत्ता 9 वी इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड व उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी कार्यकारिणी सदस्य विश्वास देशपांडे रॅलीत सहभागी झाले होते.
Pavana Pipeline : पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली

मुख्याध्यापिका रेखा परदेशी व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी या रॅलीत (Kranti Din) सहभागी झाले होते. नेत्रा दगडखैर हिने सावित्रीबाई फुले व चैतन्य देशपांडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या होत्या.
रक्षाबंधन
त्याचबरोबर 8 ऑगस्टला रक्षाबंधन वर्गा-वर्गातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधण्यात आली. तळेगाव पोलिस स्टेशन येथे स्काऊट व गाईड विभागातर्फे गाईडच्या विद्यार्थिनींनी गायडन्स अरुंधती देशमाने यांच्या समवेत पोलिस कर्मचारी व आरटीओ कर्मचारी यांना राख्या बांधल्या.
Alandi : मुक्ताईची ज्ञानदादास राखी
स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी सीआरपीएफ येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या व लिहिलेले पत्र जवानांसाठी दिले. त्याचप्रमाणे स्काऊट गाईड विभाग पुणे येथे देखील सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आल्या.

त्याचबरोबर हरित सेना व स्काऊट गाईड विभागातर्फे एका झाडाला राखी बांधण्यात आली. तसेच शाळेतील सर्व पुरुष कर्मचारी, रिक्षा व बसवाले काकांना राख्या महिला शिक्षकांनी बांधल्या. वर्गावर्गातून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.