मावळ ऑनलाईन – वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरकोळ वादातून एकत्रितपणे हल्ला करून तरुणास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत काठीने जबर मारहाण केल्याची ही घटना कामशेत ( Kamshet Crime News) येथील भिमनगर भागात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अस्मीत अनंता कदम (वय २०, व्यवसाय ऑपरेटर, रा. तिकोणा पेठ, ता. मावळ, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना दिनांक १० जून २०२५ रोजी रात्री ११:०० च्या सुमारास भिमनगर, कामशेत येथे( Kamshet Crime News) घडली.
फिर्यादी कदम हे त्यांचे मित्र मनोज दत्तात्रय गाडेकर यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले असता, तेथे उपस्थित आरोपींनी फिर्यादीकडे गाडीचा प्रकाश आमच्यावर का टाकलास, असा जाब विचारत शिवीगाळ केली. यानंतर आरोपी आयुष गुलाब शिंदे याने “तु माझा फोन का विकत घेत नाहीस?” असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या डोळ्याजवळ, डोक्यावर व पाठीवर गंभीर इजा झाली.
या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात खालील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे: आयुष गुलाब शिंदे, रोमीत सुरेश चव्हाण, अमित सोमनाथ लालगुडे (सर्व रा. भिमनगर, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे)
या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस करत ( Kamshet Crime News) आहेत.