मावळ ऑनलाईन – एका कापड दुकानात चोरीचा प्रयत्न ( Kamshet Crime News) करणाऱ्या चोराला नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना कामशेत शहरात रविवारी (दि. 3) रात्री घडली.
कामशेत पोलिसांनी संतोष विनायक गायकवाड (वय 25, रा. अंबरनाथ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चोराला पकडत असताना त्याच्या साथीदार चार महिला मात्र पसार( Kamshet Crime News) झाल्या आहेत.
Rashi Bhavishya 6 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
मिळालेल्या माहितीनुसार,कामशेत शहरात श्री छत्रपती शिवाजी चौकात रॉयल कलेक्शन कापड दुकान आहे. तिथे चोरट्यासह चार महिला आल्या होत्या. त्यांनी खरेदीच्या बहाण्याने कपड्यांची चोरी केली. ही बाब दुकानमालक धीरज परमार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली, तेव्हा तेथील ग्रामस्थ रोहिदास वाळुंज आणि इतर नागरिकांनी चोरट्याला ( Kamshet Crime News) पकडले.