situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kamshet Crime News : करुंज लोखंडवाडी येथे बेकायदेशीर जमावाने घरात घुसून मारहाण; महिलेसह तिघे गंभीर जखमी

Published On:
Kamshet Crime News
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – करुंज लोखंडवाडी येथे पांढऱ्या (Kamshet Crime News) रंगाच्या ह्युंडाई आय-१० गाडीतून आलेल्या आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसून एका कुटुंबावर जबरदस्तीने हल्ला केला. महिलेसह तिच्या पती व मुलाला मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली असून, या प्रकरणी सहा जणांविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Vadgaon Maval : अटल आरोग्य अभियानांतर्गत मावळ विचार मंचातर्फे मोफत डायलिसिस सुविधा

या घटनेत स्वाती अशोक वाळुंज (वय ५०, रा. करुंज लोखंडवाडी, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ११ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास, आरोपी आकाश शंकर लालगुडे, रोहित सुरेश लालगुडे, महेश येवले, सागर चोपडे, निलेश शांताराम येवले आणि गावडे (पूर्ण नाव अज्ञात) हे सर्वजण पांढऱ्या रंगाच्या ह्युंडाई आय-१० गाडीतून स्वाती वाळुंज यांच्या घरी आले.

स्वाती वाळुंज यांच्या सांगण्यानुसार, आकाश लालगुडे आणि सागर चोपडे यांनी घरात अनधिकृतरित्या प्रवेश करून त्यांच्या मुलगा विवेक याला “माझे पैसे दे, नाहीतर तुला खलास करेन” अशी धमकी दिली आणि त्यास हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Kamshet Crime News) केली. त्यानंतर त्याला ओढत अंगणात नेऊन पुन्हा मारहाण केली.

Pune: मला उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी देखील जाऊ शकतो – संजय शिरसाट

हा प्रकार पाहून स्वाती वाळुंज, त्यांचे पती अशोक वाळुंज आणि सासू मुक्ताबाई वाळुंज हे मुलाला वाचवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर घरावर दगडफेक करत सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

या गंभीर प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले (Kamshet Crime News) आहे.

Follow Us On