मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथे जैन इंग्लिश स्कूलमध्ये (Jain English School) प्रमुख अतिथी एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांकाचे प्राविण्य मिळवणारी विद्यार्थीनी कुमारी अंजली विशाल भोर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमास उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अमरीशजी कक्कड यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र राज्यगीता च्या माध्यमातून देश प्रेमाचे नवचैतन्य वातावरणात निर्माण झाले होते .
Golden Rotary : नारीशक्ती देशाला पुढे घेऊन जाईल- रो संतोष परदेशी
शालेय विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधिक स्वरूपात सातवीची विद्यार्थिनी मृण्मयी कदम (Jain English School)हिने आपल्या भारत देशाचे गौरवगाण भाषणातून करून देशभक्तीच्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहण्याचा संदेश आपल्या भाषणात दिला.
याप्रसंगी प्रसंगी प्रमुख अतिथी अंजली भोर यांनी (Jain English School) मनोगतातून देशा विषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.सन्माननीय मान्यवर अमरीशजी कक्कड यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन देशाप्रती आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन भावी पिढीला केले . तसेच नैतिक मूल्य जपून भारताला बळकट पाठिंबा देण्याची गरज युवा पिढीने ओळखावी तरच स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण होईल असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
Crime News : सोनसाखळी चोरट्याला अटक, 15 गुन्हे उघडकीस
स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीची जाणीव ठेवून सुजाण नागरिकांनी आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान उत्तरोत्तर वाढवावा तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याचा हक्क बजावता येईल ,zअसे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक शहा यांनी आपल्या भाषणात व्यक्त (Jain English School)केले.
शाळेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आभार प्रकट केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विजया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी भोईर ,पूजा गिल शालेय समिती सदस्य ,पदम ओसवाल ,महेंद्र राठोड ,रणजीत ओसवाल ,राकेश ओसवाल, दिलीप वाडेकर ,अजय शहा संकेत ओसवाल, तेजस वाडेकर ,सिद्धांत शहा तसेच तळेगाव नगरीतील प्रतिष्ठित मान्यवर बहुसंख्य पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कविता फाकटकर (Jain English School) यांनी केले.