Team MyPuneCity – इन्स्टाग्रामवर महिलांचे नकळत( Hadapsar Crime News) आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ प्रसारित करून त्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला हडपसर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे अटक केली आहे. किसन हनुमंत तोरडमल (वय २७, रा. शेवाळवाडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सुमारे एक वर्षांपूर्वीपासून आरोपीने संबंधित महिलेचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ तिच्या अनभिज्ञतेत इन्स्टाग्रामवर अपलोड करून समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. त्याखाली अश्लील टिप्पण्या देखील केल्या गेल्या. काही दिवसांपूर्वी याची माहिती संबंधित महिलेला मिळाल्यानंतर तिने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ( Hadapsar Crime News) संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, महावीर लोंढे यांच्या तपास पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस अंमलदार प्रकाश सावंत आणि सुनील आव्हाड यांचाही समावेश होता.
आरोपीने महिलांची खाजगी माहिती प्रसारित करून तिची सामाजिक बदनामी केल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले ( Hadapsar Crime News) करत आहेत.