मावळ ऑनलाईन –देहूरोड परिसरात एका दुचाकी चालकाचा डंपरच्या धडकेत(DehuRoad Accident ) मृत्यू झाला. ही घटना रविवारी (31 ऑगस्ट) सकाळी साडे नऊ वाजता किवळे येथे घडली. डंपर चालक फोनवर बोलत गाडी चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. देहूरोड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
मृत तरुणाचे नाव दीपक बहादूर साई (32, विकासनगर, देहूरोड) असे आहे. पोलिसांनी डंपर चालक प्रदीप मयूर यादव (उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त
Chakan: इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर घरात शिरून विवाहितेवर बलात्कार;पोलिसावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Ajit Pawar: पुणे महापालिकेने महावितरणला पिंपरी चिंचवड प्रमाणे रस्ते खुदाई शुल्क आकारावे;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक साई आपल्या दुचाकीवरून कामावर जात होते. ते एका खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. किवळे येथील साई द्वारका हाउसिंग सोसायटीसमोरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक यांचा जागीच मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.