मावळ ऑनलाईन –देहूगाव येथील श्री संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या (Dehugaon)वतीने वैंकुठगमन मंदिर(गोपाळपूरा) परिसरात सालाबाद प्रमाणे खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी पालखी सोहळा पंढरपूर कडे मार्गस्थ होण्यापूर्वी तीन दिवस तीर्थक्षेत्र देहू येथे अन्नदान केले जाते. तर पालखी सोहळा वारीनंतर देहूनगरीकडे येताना कामिका एकादशीच्या दिवशी चिंचोली येथील शनी मंदिराजवळ प्रतिवर्ष खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. मात्र यंदा १७ वर्षानंतर आळंदी मार्गे देहू असा पालखी सोहळ्याच्या मार्गात बदल करण्यात आल्याने अन्नदान मंडळाने देखील अन्नदान ठिकाणीत बदल करून देहूयेथील वैंकुठगमण मंदिर परिसरात सकाळ पासुनच खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यासाठी अन्नदान मंडळाने सुमारे बाराशे किलो साबुदाण्याची खिचडी करण्यात आली होती. या अन्न प्रसादाचा लाभ उपस्थितांनी घेतला. अन्नदान मंडळाच्या सहकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी आपली सेवा बजावली.
Sant Tukaram Palkhi : माऊलींच्या अनुपम भेट सोहळ्यानंतर संत तुकोबारायांचे देहुकडे प्रस्थान
Sant Tukaram Palkhi : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आळंदीत पुष्पवृष्टीत स्वागत

येथील प्रसिध्द व्यापारी सतिश आगरवाल व त्यांच्या कुटुंबियांनी आपला मुलगा स्व.अक्षय अग्रवाल यांच्या स्मरणार्थ खिचडी प्रसादाचे वाटप केले. आगरवाल कुटुंब गेली आठ वर्षांपासून भाविक वारकऱ्यांसाठी खिचडीची वाटपाचा हा उपक्रम राबवित आहेत.