मावळ ऑनलाईन – मावळातील कुसगाव येथे एका किराणा दुकानात शिरून दुकानदार महिलेस मारहाण करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आहे. ही घटना शनिवारी (दि.12) सायंकाळी सहाच्या सुमारास रोड लगत असलेल्या एका किराणा दुकानात (Crime News) घडली आहे.
Maval : राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यात एकविरा विद्या मंदिराची प्राची गणेश भानुसघरे प्रथम
याप्रकरणी पीडित महिलेने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अनोळखी इसम व महिला या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुसगाव येथे रोडलगत किराणा दुकान आहे त्या त्यांच्या दुकानात काम करत असताना आरोपी एका सिल्वर रंगाच्या व्हॅगनार (एम एच 12 यू एम 6740) कार मधून आले. त्यांनी थेट शिवीगाळ करत दुकानात प्रवेश (Crime News) केला. यावेळी त्यांनी महिलेला मारहाण करत महिलेच्या अंगावरील कपडे देखील फाडले.
तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र हिसकावून घेत दुकानातील रोख रक्कम काढून घेतली. यावरून महिलेने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तर पोलिसांनी आरोपींवर चोरी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे लोणावळा ग्रामीण पोलीस याचा पुढील (Crime News) तपास करत आहेत.