मावळ ऑनलाईन – भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने स्कुटीला धडक दिल्याने ( Accident) झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) रात्री १०:३० च्या सुमारास तळेगाव चाकण रोडवर माळवाडी गावाच्या हद्दीत डीओडी डेपोसमोर घडली.
Dagdusheth Ganpati : श्री गणनायक रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक
सौरभ नायकुडे (२२, माळवाडी, मावळ) असे मृत्यू झालेल्या ( Accident) तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नागनाथ महादेव नायकडे (४९, माळवाडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच १२/जेआर ८१९२) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोटारसायकल चालकाने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वेगात गाडी चालवत फिर्यादीच्या पुतण्या सौरभ नायकुडे याच्या स्कुटीला धडक दिली. या अपघातात सौरभ याच्या डोक्याला, हातापायाला ( Accident) गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.