मावळ ऑनलाईन – सामाजिक कार्याच्या माध्यमातून ( Dilip Dolas )दातृत्व करणारे नेतृत्व अशी ओळख असलेले निस्पृह व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप डोळस होय. शहरात गेली अनेक वर्ष रिक्षा चालवणारे दिलीप डोळस हे नाव तळेगावकरांना सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचयाचे आहे. त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत वेगळीच आहे दरवर्षी २७ ऑक्टोबरला ते आपली रिक्षा ‘मोफत प्रवासासाठी सज्ज ठेवतात. प्रवाशांना दिवसभर विनामूल्य सेवा देत, समाजाचं ऋण फेडण्याचा एक वेगळाच उपक्रम ते राबवतात.
मातीला बी दिलं… आणि हजार दाणे मिळाले
दिलीप डोळस सांगतात, “मी तीस वर्षांपूर्वी एकच रिक्षा घेतली होती. त्या बीजातून हजारो दाणे उगवले म्हणजेच अनेक स्नेही आणि प्रवासांच्या ओळखीने मोठे समाधान मिळालं. या रिक्षामुळेच माझं आणि माझ्या परिवाराचं सुखी, समाधानी जीवन घडले.”
Meghatai Bhagwat : संवाद आपुलकीचा …स्नेहभोजनात उमटला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
त्यांच्या मते, समाजाने दिलेलं प्रेम हेच खरे धन आहे. त्या ऋणाची परतफेड म्हणून वाढदिवशी ते संपूर्ण दिवस सर्व प्रवाशांना मोफत प्रवासाची सेवा देतात. “जन्मदिवशी माझी ही रिक्षा जिथे दिसेल, त्या रिक्षात बसा आणि आपल्या ठिकाणी उतरून मला उपकृत करा,” असे नम्र आवाहन ते प्रवाशांना करतात.
रिक्षातून मिळालं आयुष्याचं समाधान
दिलीप डोळस हे फक्त एक रिक्षा चालक नाहीत, तर ‘कृतज्ञतेचा धडा शिकवणारे असामान्य व्यक्तिमत्व आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर रामभाऊ परुळेकर शाळेतून १९८० साली शिक्षण पूर्ण करून त्यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. त्या काळात साधं( Dilip Dolas ) आयुष्य, साधे स्वप्न “प्रामाणिकपणे काम करून परिवार सुखी ठेवायचा हेच त्यांचं ध्येय होतं.
Pashan: पाषाणमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; मिठीचा बहाणा करून चोरी
आज त्यांच्या तीन मुलांपैकी दोन मुलगे आणि ते एकत्र कुटुंबात राहतात, मुलगी मुंबईत आपल्या परिवारात सुखी आहे. “दोन्ही मुले आणि मी एकत्र राहतो, सगळे सुखी आहेत… अजून काय हवं मला?” असे समाधानाने ते सांगतात.
“सामाजिक प्रेमच माझं खरं संपत्ती”
साधेपणाने जगणाऱ्या दिलीप डोळस यांच्याकडे समाजाबद्दल अतूट प्रेम आहे. “मला सामाजिक प्रेम खूप मिळाले. लोकांनी जे दिलं, ते परत करायचं हेच माझं तत्त्व आहे,” असे ते सांगतात.
त्यांचा वाढदिवस म्हणजे रिक्षातून फिरणारी एक ‘मोफत सेवा मोहिम प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसणारे हसूच त्यांच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस व समाधान ( Dilip Dolas )असतं.
प्रेरणा समाजासाठी!
आजच्या स्वार्थी जगात दिलीप डोळस यांची ‘मोफत सेवा’ परंपरा समाजाला प्रेरणा देणारा संदेश आहे. “आयुष्याने दिलेलं समाधान समाजाला परत द्या; कारण सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे.
शहरातील वेगवेगळ्या समस्यांबाबत डोळस आवाज उठवतात. निकृष्ट रस्ते, पाणीपुरवठा, कचरा समस्या अशा विविध नागरी समस्यांकडे ते डोळसपणे पाहून प्रशासनाला त्या समस्यांची दखल घेण्यास भाग पाडतात. डोळस ( Dilip Dolas ) यांनी वेगवेगळ्या समस्यांबाबत पत्रव्यवहार करून प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा देखील पवित्रा घेतला आहे.




















