इंदोरीत मेघाताई भागवत यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला प्रचंड गर्दी
मावळ ऑनलाईन – इंदोरी येथे “संवाद आपुलकीचा — नात आपुलकीचं” या भावनिक संदेशाने सजलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाचे ( Meghatai Bhagwat ) आयोजन प्रशांतदादा भागवत (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ) आणि मेघाताई प्रशांतदादा भागवत (उपाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदोरी शहर) यांच्या वतीने करण्यात आले.
Rupesh Marne : ९ महिन्यांपासून फरार असलेला गजानन मारणे टोळीतील रुपेश मारणेला अखेर अटक
रविवार, दि. 26 ऑक्टोबर रोजी प्रशांतदादा भागवत यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गर्दी केली. स्नेह आणि आपुलकीच्या वातावरणात झालेल्या या संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग ( Meghatai Bhagwat ) घेतला.
या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, गणेशजी खांडगे, महिला अध्यक्ष सुवर्णा राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने ( Meghatai Bhagwat ) उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांनी आपला जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी मागणी अर्ज आमदार सुनील शेळके यांच्या कडे सुपूर्द केला, ज्यामुळे या कार्यक्रमाने राजकीय रंगही चढला.
इंदोरी–वराळे गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी मेघाताई भागवत या अत्यंत प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून समोर येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत त्यांच्या उमेदवारीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण कार्यक्रमात आपुलकी, स्नेह, आणि एकीचा संदेश देत “आपलेपणाची भावना” कार्यकर्त्यांच्या मनात अधिक दृढ ( Meghatai Bhagwat ) झाली.



















