पवन मावळातील प्रमुख सहकारी संस्था, पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या (Maval)उपाध्यक्षपदी संस्थेचे विद्यमान संचालक बाळू आखाडे यांची निवड करण्यात आली आहे. (दि १६) रोजी संस्थेची मासिक सभा पार पडली, या सभेत सर्वानुमते बाळू चिंधू आखाडे यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पवना कृषक सेवा सहकारी संस्था मर्या. काले वसाहत, पवनानगर (ता. मावळ) या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाऊ सावंत यांनी याबाबत माहिती दिली. पवना कृषक संस्थेची गतवर्षी निवडणूक पार पडली. यामध्ये एकूण १३ संचालक निवडून आले होते. त्यातून भाऊ सावंत यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून व गणपत घारे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. परंतु १३ पैकी २ संचालक हे अपात्र ठरले, त्यापैकी एक गणपत घारे हे होते. त्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी १६ ऑक्टोबरच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला, त्यामध्ये सर्व संचालकांच्या संमतीने बाळू आखाडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
Maval Crime News : मावळातील सुदवडी येथे हातभट्टी दारू निर्मितीचा पर्दाफाश
Rashi Bhavishya 25 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

बाळू चिंधू आखाडे हे पवन मावळातील शिळींब गावचे रहिवासी असून पवनमावळातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा लौकीक आहे. धनगर समाजातील असलेल्या बाळू आखाडे यांनी पारंपारिक दुग्ध व्यवसायासोबत आधुनिक शेतीत स्वतःला झोकून दिले आहे. पवना कृषक संस्थेच्या वाटचालीत त्यांचे योगदान राहिले आहे. त्यामुळे या संस्थेच्या उपाध्यक्षपदावर त्यांची निवड सार्थ ठरत असून या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.



















