मावळ ऑनलाईन – पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्य पदांच्या (Maval)निवडणुकांसाठी आरक्षण सोडत सोमवारी (दि. १३) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. तर तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयात पंचायत समिती सदस्यांची आरक्षण सोडत जाहीर झाली. मावळ पंचायत समितीच्या दहा जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
मावळ तालुक्यातून पुणे जिल्हा परिषदेवर पाच सदस्य निवडून जातात. टाकवे, इंदुरी, खडकाळे, कुसगाव, सोमाटणे या गटांमधून हे सदस्य निवडले जातात. या पाच गटांसाठी जाहीर झालेले आरक्षण
Talegaon Dabhade:राव कॉलनी मध्ये खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचा आनंद
टाकवे – अनुसूचित जमाती पुरुष
इंदोरी – सर्वसाधारण महिला
खडकाळे – सर्वसाधारण महिला
कुसगाव – सर्वसाधारण पुरुष
सोमाटणे – सर्वसाधारण महिला
मावळ पंचायत समिती मध्ये १० सदस्य आहेत. नाणे, वराळे, इंदोरी, कार्ला, कुसगाव बुद्रुक, काले, सोमाटणे, चांदखेड, खडकाळा आणि टाकावे बुद्रुक या गणांचा समावेश आहे. वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे ही आरक्षण सोडत पार पडली. या दहा गणांसाठी जाहीर झालेले आरक्षण
नाणे – अनुसूचित जमाती स्त्री
वराळे – सर्वसाधारण
इंदोरी – सर्वसाधारण
कार्ला – सर्वसाधारण स्त्री
कुसगांव बु.- सर्वसाधारण
काले – सर्वसाधारण स्त्री
सोमाटणे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
चांदखेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
खडकाळा – अनुसूचित जाती
टाकवे बु. – सर्वसाधारण स्त्री
राजकीय हालचालींना वेग
आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांनी छुप्या मार्गाने प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठी आणि तालुक्यातील पक्षाचे प्रभारी यांच्याकडे आपल्या नावाची शिफारस केली जात आहे. मागील काही दिवसांत मावळ तालुक्यात बदललेली राजकीय समीकरणे पाहता भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या महायुती मधील दोन घटक पक्षांमध्ये चुरस लागण्याची शक्यता आहे.