मावळ ऑनलाईन – जागतिक पोस्ट ऑफिस दिनानिमित्त सुखद होमिओपॅथिक क्लिनिक तर्फे यशवंत नगर पोस्ट ऑफिस ( Talegaon Dabhade News)येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्देश सतत सेवा देणाऱ्या पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांच्यात आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे हा होता.
या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह तपासणी, वजन–उंची प्रमाण तपासणी, जीवनशैलीविषयक सल्ला तसेच होमिओपॅथिक आरोग्य सल्ला देण्यात आला. कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपामुळे होणारा ताण, झोपेची कमतरता व आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यात ( Talegaon Dabhade News)आले.
Pune: कोजागरी पौर्णिमेनिमित्त “ग़ज़लियत” दिल की दास्ता चे सोमवारी आयोजन
डॉ. सायली देबडवार फुटाणे (सुखद होमिओपॅथिक क्लिनिक) यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले तसेच नैसर्गिक, संतुलित आहार व व्यायामाचे फायदे स्पष्ट केले. यशवंत नगर पोस्ट ऑफिस अंतर्गत येणारे आंबळे, आंबी, इंदुरी,नवलाख उंबरे, वराळे, विष्णुपुरी या उप टपाल कार्यालयातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी या आरोग्य तपासणीचा लाभ ( Talegaon Dabhade News) घेतला.
सुखद होमिओपॅथिक क्लिनिकच्या संस्थापक डॉ सायली व टीम यांनी पुढेही समाजोपयोगी आरोग्य उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली.यशवंत नगर पोस्ट ऑफिसचे मुख्य पोस्ट मास्टर श्रीमती प्रेरणा मेश्राम व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून क्लिनिकचे आभार ( Talegaon Dabhade News) मानले.



















