मावळ ऑनलाईन – देहुरोड (ता. हवेली) येथे ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ( Dehuroad Crime News) दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हाणामारी व दगडफेकीच्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री सुमारे नऊ वाजता कणसे हॉस्पीटल मागे सुपर दुर्गा मार्केटजवळ आणि त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास बापदेवनगर येथे ही घटना घडली.
Cyber Crime : नफ्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा; गुंतवणूकदाराची पोलिसांत धाव
या प्रकरणी राकेशकुमार बलवीर कल्याण (वय ३४, रा. बापदेवनगर, देहुरोड, मुळगाव हरियाणा) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुर्या मुर्गन (२०), आकाश मुर्गन (२१), अजितकुमार राजकुमार कल्लीमुर्ती (२१) आणि अजित मायाकृष्ण स्वामी (२२, सर्व रा. एस. बी. कॅम्प, देहुरोड) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्यांना अटक( Dehuroad Crime News) झालेली नाही.
Ajit Pawar : पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांशी झालेल्या वादातून राग धरून त्यांना व त्यांच्या पत्नीला तसेच पुतण्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी करत घरावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत फिर्यादीचा पुतण्या दिपक कल्याण याच्या डोक्यास दगड लागून दुखापत झाली. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण ( Dehuroad Crime News) झाले होते.