मावळ ऑनलाईन – अलीकडील अतिवृष्टी आणि महापूरामुळे ( Ajit Pawar)मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून सामाजिक बांधिलकी जपत एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासनाकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी फेडरेशनच्या अध्यक्षा रेशमाताई अनिल भोसले,सचिव संतोष छबुराव भेगडे तसेच फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव हुलावळे, संचालक व पुणे ( Ajit Pawar) महानगरपालिकेचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील व इतर मान्यवर संचालक उपस्थित होते.
Cyber Crime : नफ्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा; गुंतवणूकदाराची पोलिसांत धाव
अध्यक्षा रेशमाताई भोसले यांनी सांगितले की, “पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन ही केवळ आर्थिक संस्था नसून सामाजिक दायित्व जपणारी संघटना आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची परंपरा आहे.”
सचिव संतोष भेगडे यांनीही सांगितले की, “फेडरेशनने पूर्वीही नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य केले असून,पुढेही अशा सामाजिक कार्यात आघाडी घेण्याचा ( Ajit Pawar)आमचा निर्धार आहे.”
Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे येथे घरात घुसून हल्ला; , चौघांविरुद् गुन्हा दाखल
फेडरेशनकडून सांगण्यात आले की, समाजातील प्रत्येक घटकासोबत संकटाच्या काळात उभे राहणे ही संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्याचा हेतू या मदतीमागे आहे.पुणे जिल्ह्यात पतसंस्था फेडरेशनच्या २ हजार पतसंस्था सभासद आहेत.
या प्रसंगी उपस्थित संचालकांनी फेडरेशनच्या उपक्रमाचे कौतुक करत पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाजातील सर्व स्तरांनी हातभार लावावा, असे आवाहन ( Ajit Pawar) केले.